रत्नागिरी: मुंबई विद्यापीठ आणि के. एम. सी. महाविद्यालय, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धा विभागीय फेरीत ७६ किलो वजनी गटात भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाची तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी दिशा दिपक झोरे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला स्पर्धेसाठी तिला भारत शिक्षण मंडळाचे क्रीडा विभाग संचालक चंद्रकांत घवाळी यांनी मार्गदर्शन केले.
दिशा झोरे हिचा भारत शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष दिनकर पटवर्धन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था कार्यवाह सुनिल वणजू, संस्था सदस्य सतीश दळी, प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, क्रीडा विभागप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिशा हिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.