सोलापूर - मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मोरवंची येथील प्रार्थना फौंडेशनच्या प्रार्थना बालग्राम वृध्दाश्रम येथील निराधार वृध्द आणि मुलांसमवेत दिवाळीच्या पुर्वसंध्येला एकत्रित येऊन फराळाचा आस्वाद घेतला. आणि फुलबाज्या, फटाके आणि आतिषबाजी करून दिवाळी साजरी केली. 

दिवाळी हा सण आनंदाचा प्रत्येकाच्या घरात फराळीचा घमघमाट सुटतो. मात्र ही अनाथ मुलं आणि वृद्ध निराधार या पासून वंचित राहतात. यांनी ही दिवाळी आनंदात साजरी करावी या हेतूने छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांच्या पुढाकाराने चिवडा, चकली, शेव, लाडू सर्वांसमवेत एकत्र येऊन फराळ करण्यात आला. मुलांना टोपी टाॅवेल देऊन आहेर करण्यात आला.उपस्थित मुलं आणि वृद्धांच्या सोबत गप्पा मारत फराळाचा आस्वाद घेण्यात आला. जाती धर्माच्या भिंती ओलांडून मुस्लिम मावळ्यांनी हिंदूंच्या सणाचा आनंद द्विगुणित केला असा सोहळा प्रथमच पाहत आहोत हिच खरी आपली संस्कृती आहे. याची प्रचिती आली असे मत येथील निराधारांनी व्यक्त केला. या प्रसंगी फळांचा ही वाटप करण्यात आला. आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

या हृदय स्पर्शी कार्यक्रमास छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, प्रार्थना फौंडेशनचे प्रसाद मोहिते, सौ अनु मोहिते, आसिफ इक्बाल, राजू हुंडेकरी डॉ असद उल्ला मुन्शी , बशीर सय्यद, तन्वीर गुलजार कादर भागानगरी अझहर पठाण आदी मुस्लिम मावळे उपस्थित होते.