शिरीष सरदेशपांडे सोलापुर ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक ,शनिवार घेणार पदभार
सोलापूर :- सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली आहे. सोलापूरला पोलीस अधीक्षक म्हणून शिरीष सरदेशपांडे हे येणार असून शनिवारी ते पदभार घेणार आहेत. मागील महिन्यातच सरदेशपांडे यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकही मिळाले आहे.