पाटोदा (प्रतिनिधी) महिलांनी उद्योग क्षेत्रात यावे म्हणून सरकार अनेक उपाय योजना करत असतात असेच गुरूवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी पाटोदा पंचायत समिती आवारात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत महिला बचत गटाचे दिवाळी निमित्त फराळ स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये पाटोदा तालुक्यातील दहा बचत गटांनी दिवाळी फराळ व विविध साहित्य विक्री साठी ठेवण्यात आले आहे. स्टॉलचे उदघाटन गट विकास अधिकारी जाधव साहेब,विस्तार अधिकारी राख साहेब, विस्तार अधिकारी भूतपल्ले साहेब,जवकर साहेब,बुंदे साहेब,तालुका अभियान व्यवस्थापक वीर सर, तालुका व्यवस्थापक खेडकर मॅडम,प्रभाग समन्वयक संतोष भोसले, शकुंतला जावळे, वैशाली देवकाते,अविनाश साबळे, स्वाती मिसाळ, यांच्या सह महिला उपस्थित होत्या. स्टॉलवर पारगाव घु सरपंच पदमाकर घुमरे, पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष सोमनाथ कोल्हे,पञकार पोपट कोल्हे, पत्रकार गणेश शेवाळे, राहुल सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, राहूल शिरोळे यांनी खरेदी केली