औरंगाबाद : अर्ध्या तासात पैसे डब्बल करून देतो अशा थाप मारून ७१०८०/- रूपयांचा भरणा करून घेवून फसवणूक केली आहे. पोलिसांनी इन्स्टाग्राम खात्यांची माहिती हस्तगत करून आरोपी हा सुरत गुजरात राज्यातील असुन सय्यद महंमद उनेस मियाँ हाफीज वय ३० वर्ष, व्यवसाय व्यापार (जुने मोबाईल खरेदी विक्री) रा. १०१, अलकुरेशी अपार्टमेंट, नानपुरा मार्केट, सुरत राज्य गुजरात या आरोपीला अटक केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैसे कमविण्यासाठी त्यांनी क्रिप्टो ट्रेडिंगचे नावाने इन्स्टाग्राम खाते तयार केले. तसेच खात्यावर लोक गुंतवणूकीसाठी त्यांना मेसेज करत ते त्यांना अर्ध्या तासात तुमचे पैसे डब्बल करून देतो असे सांगून पैशांचा भरणा करून घेत. याप्रकारे त्यांनी बराच लोकांची फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे. आरोपीने आणखी कोणकोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून नमूद आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर मंजूर केला असून गुन्हयाचा अधिक तपास पोलिस करत आहे ही कारवाई मा. मनिष कलवानिया, पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण, डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांचे मार्गदर्शनानुसार श्री. अशोक घुगे, पोनि सायबर, प्रविण पाटील, भारत माने पोउपनि पोह/ कैलास कामठे, संदिप वरपे, नितिन जाधव, रविंद्र लोखंडे, सविता जायभाये, मुकेश वाघ, योगेश दारवंटे, शितल खंडागळे सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण यांनी केले