संगमेश्वर : तालुक्यातील देवरुख-येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा देवरुख नं.३ येथे संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या तर्फे शाळेला एक संगणक संच भेट देण्यात आला. आमदार शेखर निकम यांनी शाळेच्या दोन नवीन वर्गखोल्यांच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या मातोश्री कै.अनुराधाताई निकम यांच्या स्मरणार्थ शाळेला एक संगणक संच भेट देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार काल स्वतः आमदार शेखर निकम यांनी संगणक संच शाळेला भेट दिला व शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ज्ञ युयुत्सु आर्ते यांनी शाळेच्या वतीने आमदारांचे आभार मानले
या वेळी संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत चौगले, सहाय्यक गटविकास अधिकारी शिंदे, देवरुख शहर अध्यक्ष हनिफ शेठ हरचिरकर, जिल्हा कार्यकरणी सदस्य बाळू शेठ ढवळे, युवक अध्यक्ष पंकज पुसाळकर, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सरपंच प्रवीण टक्के, सरचिटणीस राजू वनकुंद्रे, जितेंद्र शेट्ये, युवक देवरुख शहर अध्यक्ष अमित बंडू जाधव, विध्यार्थी शहर अध्यक्ष इमरान जेठी, प्रतिक जाधव, प्रशांत कांबळे, अल्पसंख्याक अल्ताब जेठी, वसंत तावडे, महेंद्र पेंढारी, युवक देवरुख शहर उपाध्यक्ष रवींद्र लाड,आदी मान्यवर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कृतिका सावंत व शिक्षक व पालक उपस्थित होते.