खेड: आपल्या अंगावर चाल करून बिबट्यापासून कुळयेवाशी गावातील शेतकऱ्याने ऐनवेळी झाडावर चढून तसेच आरडाओरडा करत आपला जीव वाचवला. झाडावर चढल्यानंतर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्याने गावात फोन केला आणि ग्रामस्थांना बोलावून घेतले. ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने आले आणि बिबट्या पळून गेला. शेतीची राखण करणाऱ्या शेतकऱ्याचे प्राण वाचल्याची ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आत्माराम गावडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गावात भात शेती तयार झाली आहे. यातच पाऊस पडत असल्याने शेतीची कापणी रखडली आहे. शेतीची वन्यप्राण्यांकडून नासधूस होऊ नये, यासाठी शेतकरी रात्रभर राखण करतात. आत्माराम गावडे हे 'गंगेचे तळे' या ठिकाणी असलेल्या भातशेतीची राखण करण्यासाठी शुक्रवारी रात्री ८ वा.च्या सुमारास गेले. शेतीच्या कडेला जाऊन उभे राहिले. यावेळी ते नेहमीप्रमाणे बॅटरी मारून परिसरात पाहणी करत होते. बॅटरी सर्व बाजूने फिरवत असताना बॅटरीचा फोकस जवळच असलेल्या बिबट्यावर पडला अन् गावडे घाबरले. त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या त्यांच्याच बाजूने पुढे येऊ लागला. यावर गावडे यांनी ऐनाच्या झाडाचा आधार घेतला. घाबरलेल्या स्थितीत झाडावर चढताना ते एकदा खाली पडले. तरीही जीवाच्या आकांताने ओरडत ते झाडावर चढून बसले. बिबट्याही झाडापाशी आला. गावडे पुरते घाबरले. त्यांनी मोबाईलवरून गावकऱ्यांना सांगून ताबडतोब 'मला वाचवायला या' असे सांगितले.
यावर १० ते १२ ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने बॅटऱ्या घेऊन धावले. त्यांना पाहून बिबट्याने पळ काढला. त्यानंतर गावडे झाडावरून घाबरलेल्या स्थितीत उतरले. जीव वाचल्यामुळे ग्रामस्थांचे आभार मानून घरी परतले. ग्रामस्थ वेळेवर पोहोचल्यामुळे अनर्थ टळला, अशी भावना गावडे यांनी व्यक्त केली.
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
या परिसरात अजूनही बिबटे फिरत आहेत. सोमवारी रात्री ८ वा. च्या सुमारास मंगेश भेकरे यांच्या अंगणातील मांजरांवर झडप घालण्यासाठी बिबट्या आला. यावेळी त्यांच्या पत्नीने त्याला पाहताच आरडाओरड केली. जंगलात दर्शन देणारा बिबट्या मनुष्यवस्तीत आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.