औरंगाबाद : परतीच्या पावसाने मराठवाड्यासह  औरंगाबाद जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे . कन्नड तालुक्यातील नाचनवेलजवळ आमदाबाद येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी अंजना नदीच्या पात्रात गावातील एका महिलेच्या मृतदेहाला अग्निडाग दिला . परंतु पिशोर भागात एक तास मुसळधार पाऊस झाल्याने नदीच्या पात्रात पाणी प्रचंड वाढले आणि चितेला पाण्याचा वेढा पडला . मृतदेह अर्धवट जळत असल्याचे पाहून नागरिकांनी टायर आणून शेवटी अंत्यसंस्कार उरकले . दर पावसाळ्यात आमदाबादवासीयांची अशी दैना होते . चितेच्या अग्निडागामुळे किमान मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचा डाग समोर आला असून रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत . आमदाबाद येथे नदीपात्रातील उंच भागात महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले . पण चितेला अचानक पाण्याचा वेढा पडला . इन्सेट : ग्रामस्थांनी टायर टाकून अंत्यसंस्कार केले . दर पावसाळ्यात उद्भवते समस्या आमदाबाद येथील शांताबाई गोटीराम बनकर यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही वेळातच नदीची पाणीपातळी वाढून धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले . गावाजवळून वाहणाऱ्या अंजना नदीला पाणी असल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह मोकळ्या जागी नेता येत नाही . त्यामुळे मृतदेहावर नदीपात्रातच उंच जागा बघून अंत्यसंस्कार करावे लागतात . नेमके पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण होते . टायर टाकून अंत्यसंस्कार गेल्या महिन्यात पिशोरसह नाचनवेल व आमदाबाद परिसरात जोरदार पाऊस झाला होता . त्यामुळे गावांचा संपर्कही तुटला होता . पिशोरला बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एक तास मुसळधार पाऊस झाल्याने त्याचे पाणी आमदाबादला अंजना नदीला आले आणि चितेला पाण्याचा वेढा पडला . मृतदेह अर्धवट जळाल्याने टायर टाकून अंत्यसंस्कार करावे लागले . स्मशानभूमीला मंजुरी , पण .. आमदाबादची लोकसंख्या १५०० च्या आसपास आहे . अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न कायम आहे . आमदार निधीतून स्मशानभूमीचे काम जून २०२२ मध्ये मंजूर झाले . दोन वर्षांपूर्वी नदीचे खोलीकरण केल्यामुळे रस्ता वाहून गेला आणि ग्रामस्थांना गावातील मोकळ्या शेतात मृतदेह अंत्यसंस्काराला नेता येत नाही . स्मशानभूमीचे काम तत्काळ करावे , अशी मागणी जोर धरत आहे .

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं