संगमेश्वर: टेनिस क्रिकेट महाराष्ट्र संघामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणुन निवड झाल्याने श्री.रणजित रविंद्र पवार याचा रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्या रत्नागिरी शाखा देवरूखचे शाखा संचालक श्री प्रकाश पाढरे, संचालक श्री.निलेश कुंभार व माजी चेअरमन सत्यवान (भाई) शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी पतपेढी संचालक श्री निलेश कुंभार यांनी रणजितचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पतपेढी शाखा देवरूख शाखाधिकारी सौ. साटवीलकर मॅडम,कर्मचारी प्रविण काळे,अजीत कुळ्ये तसेच शिक्षकेत्तर संघटनेचे कोसुंब विभाग प्रमुख श्री स्वप्नील झेपले व माजी उपाध्यक्ष श्री विशाल जाधव उपस्थित होते.