जिल्हाधिकारी साहेब,याना निवेदन मा. नगर सेवक,अ. मुखीद अ. माजीद,जिंतुर.

:

प्रतिनिधि जिंतूर 

 

जिंतुर नगर पालिकेतील नगर अभियंता श्री देशपांडे यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करुन कडक कारवाई करां 

अ. मुखीद अ. माजीद, मा. नगर सेवक, जिंतुर. जिल्हा अधिकारी परभणी याना निवेदनाद्वारे सविस्तर माहिती नुसार आपल्या निवेदनात तक्रार देण्यात आली की, पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थीना निधी वितरण करण्यात विलंब होत आहे. गेल्या तीन महिण्यापासुन न. प. जिंतुर तर्फे लाभार्थाना निधी वितरण करण्यास नगर अभियंता देशपांडे हे टाळाटाळ करत आहे. सदरिल लाभार्यांची सर्वे करून सदरिल यादी दाखल करण्याची जबाबदारी संबंधीत नगर अभियंता याच्या वर

आसते. हे हेतुपुरस्पर दिरंगाई करित आहे. जिंतूर नगर अभियंता हा आपल्या कामात दिरंगाई करित असल्यामुळे लाभ्यार्थांना वेळेवर हफ्ते मिळत नाही याचा परिणामी लाभार्थांची आर्थिक कुचंबना होत आहे.

सदर नगर अभियंता यांच्याकडे लाभार्थ्यांना किती हप्ते व किती रक्कम टाकण्यातआली या बाबतच्या तपशील नाही, त्याचा आवक जावक नोंदी दिसत नाही या संबंधी विचारणा केली असता "तुम्ही बँकेतून स्टेटमेंट आणा" असे लाभार्थीना अभियंता सांगत असते निधी नसल्यामुळे कामे खोळंबलेली आहे. पावसाळ्यात बरेच लाभार्थांचे घर हे पाण्याने गळत आहे. काही लाभार्थांनी तर स्वतः चे घर पाडून अर्धवट कामे झाली असल्यामुळे किरायाने खोली करून राहत आहे. त्याचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड लाभार्थाना सहन करावा लागत असल्यामुळे

तरी आपणास विनंती की, आपण या संबंधीत नगर अभियंतावर चौकशी करुन कडक कार्यवाही करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने गरीब दुबळ्या लाभार्थ्यांना सोबत घेऊन न. प. आवारात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आले आहे.