वैजापूर तालुक्यातील दहेगावसह परिसरातील ग्रामीण भागात राज्यात बंदी असलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम किराणा दुकान , पानटपरी , चहाचे दुकान व छोट्या - मोठ्या टपऱ्यात अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे . अन्न , भेसळ प्रशासनासह पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे . राज्यात गुटखाबंदी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या सुरू आहे . गुटख्याची विक्री औरंगाबाद शहरासह वैजापूर , बोरदहेगाव , परसोडा , शिवराई , धोंदलगाव , लासूर पालखेड , स्टेशन , लासूरगाव , कसाबखेडा , शिऊर , गारज , नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर , कोपरगाव , गुटखा माफियांकडून ग्रामीण भागापर्यंत गुटखा पुरवठा केला जातो . यातून दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत असून यामुळे मात्र अल्पवयीन तरुण व्यसनाधीन होत आहे . दरम्यान , समृद्धी महामार्गालगत असलेल्या गावात समृद्धी महामार्गाने अवैध वाहतूक करून गुटखा , दारूची वाहतूक मध्यरात्री ते सकाळपर्यंत केली जाते म्हणून अवैध धंद्यासाठी समृद्धी महामार्ग खुश्कीचा मार्ग बनत चालला आहे . त्यामुळे पोलिसांनी या अवैध धंद्यांना पायबंद घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली