रत्नागिरी : रत्नागिरी-राजापूर तालुक्यात ठाकरे गटाला यश आले आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडून राजन साळवींचं कौतुक करण्यात आले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आंगले, सौंदळ, राजवाडीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहेत. दक्षिण रत्नागिरीत १८ जागांवर उद्धव ठाकरे गटाचा दबदबा दिसला. यानंतर सोमवारी राजन साळवी यांना उद्धव ठाकरे यांचा फोन करुन मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यानुसार राजन साळवींनी उध्दव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उध्दव ठाकरेंनी राजन साळवींचे तोंडभरुन कौतुक केले.
दरम्यान, राजन साळवी यांची सोमवारी अचानक सुरक्षा काढण्यात आली आहे. यानंतरही माझी निष्ठा कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशीच आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक म्हणूनच आहे. कुठंही जाणार नाही, असं राजन साळवी म्हणाले होते. ठाकरे गट अस्थिर असताना राजन साळवी यांनी कायम शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला आहे.