पैठण येथील नाथसागराचे १६ दरवाजे बंद..

पैठण/

पैठण येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून मोठ्या प्रमाणावर येणारी पाण्याची आवक आज कमी झाली. त्यामुळे धरणाचे उघडण्यात आलेल्या १८ दरवाजापैकी १० दरवाजे दोन दिवसापूर्वी बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला तर आज पुन्हा नाथसागर धरणाचे आणखी 6 दरवाजे बंद करण्यात आले असुन 2 दरवाज्यातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे 18 दरवाजे पैकी जवळपास 16 दरवाजे बंद करण्यात आले असून दोन दरवाज्यातून 2100 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

 नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर येत होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढल्याने धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात येऊन गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु आज धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी गोदावरी नदीतील विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १८ दरवाजापैकी १६ दरवाजे बंद करण्यात आले. आता नदीपात्रात २१००क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.