बीड (प्रतिनिधी) 18 ऑक्टोंबर बीड शहरात वा जिल्ह्यात विशेष करून पेठ बीड भागात अवैध धंद्याचे साम्राज्य पसरत चालले असून जुगार,चक्री जुगार, कल्याण मुंबई मटका,सटा, खाजगी सावकारकी,बनवाट मद्य,गुटखा विक्री असे अवैध धंदे जोमात सुरु आहेत बीड जिल्हा हा उपेक्षित कष्टकरी कामगारांचा जिल्हा असून अवैध धंद्यामुळे संबंध उपेक्षित,कष्टकरी, कामगार वर्ग,तसेच तरुण पिढी व्यसनाधिनतेच्या आहारी जात आहे कष्टाचा घामाचा पैसा जुगार, मटक्यात घातला जात असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत
बीड शहरात तर सरार्स पणे जुगार अड्डे, कल्याण,मुंबई मटका चालवला जात आहे अवैध धंदे करणाऱ्यांना कायद्याचा कसल्याही प्रकारचा धाक राहिला नसल्याने अवैध धंदे फोफावत आहेत यावर जर का वेळीच प्रतिबंध केला गेला नाही तर बीड जिल्ह्याची अधोगती निश्चित आहे बीड शहराच्या व बीड जिल्ह्याच्या प्रगती साठी तसेच कायद्याच्या दृष्टीने अवैध धंद्याची पाळमूळ समूळ नष्ट करून
जुगार,चक्री जुगार, कल्याण मुंबई मटका,सटा, खाजगी सावकारकी,बनवाट मद्य,गुटखा विक्री असे अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर रित्या कठोर कार्यवाही करून अवैध धंदे कायमचे बंद करा अशी मागणी *भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांचे सह राज्य प्रवक्ते अशोकराव कांबळे मंगेश जोगदंड,सचिन जाधव,महादेव वंजारे आदींच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक मा.नंदकुमार ठाकूर यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे