रत्नागिरी : शहरातील बाजारपेठेत आज प्लास्टिक वापराबाबत धडक कारवाई करण्यात आली. नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांच्या वतीने सब रिजनल ऑफिसर राहुल मोटे सर तसेच अमित लाट्ये यांनी शहरातील १५ पेक्षा जास्त आस्थापनांची पाहणी केली असून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात आली.

 रत्नागिरी शहरातील राम आळी ते गोखले नाका या व्यापारी भागातून ७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच विविध आस्थापनांच्या माध्यमातून ३० हजार रुपयेचा दंड देखील आकारण्यात आला. 

     

 इथून पुढे सुद्धा शहरात सिंगल युज प्लास्टिक वापरताना आढळून आल्यास त्या आस्थापनांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

     शहरातील सर्व नागरिकांनी व्यापारी बंधूंनी जास्तीत जास्त कापडी ,कागदी व जुट पिशवीचा वापर करुया व आपल्या रत्नागिरी शहराला स्वच्छ, सुंदर , हरित आणि प्लास्टिक मुक्त करुया असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .