खेड: येथील नगर परिषदेमार्फत सिंगल यूज प्लास्टिक कॅरिबॅग वापरावर पूर्णपणे बंदी असतानादेखील त्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सोमवार दि. १७ रोजी धडक कारवाई केली. यावेळी ११ किलो पिशव्या जप्त करण्यात आल्या तर सुमारे १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
शासनाच्या आदेशानुसार दि १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज कॅरिबॅग पूर्णतः बंदी केली आहे. मात्र सर्रास या आदेशाचे उल्लंघन होत आहे. सोमवार, दि. १७ रोजी प्रभारी मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चिपळूणचे अधिकारी सुशीलकुमार शिंदे, नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, कर व प्रशासकीय सेवा प्रमुख अभिजित पाटील, वसुली विभाग प्रमुख गंगाधर गायकवाड, राजेंद्र तांबे, सुबोध जाधव, मनोज म्हातले यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली.
यावेळी ३४ दुकानांना अचानक भेटी देऊन ३ दुकानदारांकडून ११ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणेत आली. या दुकानदारांकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.