अकोला दिनांक 18 ऑक्टोंबर 2022

सततचा पाऊस पडल्यामुळे अकोला ते अकोट मार्गावरील गांधीग्राम हा पुल खालून हा मधोमध चीर पडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी धोक्याची घंटा नाकारता येत नसून या पुलाखालून पूर्णा ही नदी वाहते,

ती सध्या पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तरी सर्व नागरिकांनी अकोट कडे जाण्याचा पर्यायी मार्ग अवलंब करावा असे आवाहन अकोला जिल्हा वाहतूक पोलीस यांनी केले आहे.