मंडणगड : भारजा नदीपात्रात केळवत बामणघर गावाचे हद्दीत मळ्याचा डोह या ठिकाणी स्थानिक तरुणास १४ ऑक्टोबर रोजी नदी किनारी आराम करीत असलेल्या मगरीचे दर्शन घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या ठिकाणी मगरीचा वावर असल्याची चर्चा होती. मात्र वास्तवात मगर निदर्शनास आल्याने मगरीचा बंदोबस्त करण्याची गरज असून या ठिकाणी विविध कारणांनी मानवी वावर असल्याने केळवत बामणघर येथील ग्रामस्थ चिंतेत दिसून आले. ले बामणघर येथील एका युवकाला मगर नदीकाठी दिसल्याने त्याने काही लोकांना याबद्दल माहिती दिली त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बामणघर केळवत या गावातील महिलावर्ग या ठिकाणी कपडे धुण्यासाठी तसेच भांडी धुण्यासाठी जात असतात तसेच काही शेतकरी पाणी पिण्यासाठी गुरे नदीवर घेऊन जात असल्याने त्यांचे मनामध्ये ही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आदिवासी बांधव येथे मासे पकडण्यासाठी जात असतात त्यामुळे ग्रामस्थांनी लवकरात लवकर या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.