दापोली : बिरसा फायटर्सच्या चिपळूण तालुकाध्यक्ष पदी सुरेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर तालुका सचिव पदी अक्षय निकम यांची निवड करण्यात आली. सुरेश पवार, अक्षय निकम सह चिपळूणमधील हजारों आदिवासी कार्यकर्त्यांनी सुशिलकुमार पावरा यांच्या सामाजिक कामाला प्रभावित होऊन बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी सुरेश पवार निकम यांची चिपळूण तालुकाध्यक्षपदी निवड वेली व सचिवपदी अक्षय निकम यांची निवड केली. तसेच उर्वरित चिपळूण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी दापोलीतील आक्रोश मोर्चा व आंदोलनात चिपळूणमधील हजारों आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला होता. त्याच दिवशी सुशिलकुमार पावरा यांनी दापोलीत गोल्ड व्हॅलीत सुरेश पवार व अक्षय निकम यांना शुभेच्छा देत सत्कार केला. सुरेश पवार व अक्षय निकम हे रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजाचे तरूण सामाजिक कार्यकर्ते आहेत. हजारों तरुण मंडळी बिरसा फायटर्सच्या चिपळूण टीममध्ये सामील झाले आहेत. सुरेश पवार यांची बिरसा फायटर्सच्या चिपळूण तालुकाध्यक्षपदी व अक्षय निकम यांची सचिवपदी निवड झाल्याबददल जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी, कार्याध्यक्ष संदीप पवार, राज्य महिला प्रतिनिधा चंद्रभागा पवार व राज्यातील बिरसा फायटर्सच्या पदाधिकारी सदस्यांनी अभिनंदन वेले आहे. चिपळूण तालुक्यातील बिरसा फायटर्सच्या नवीन टीमवर आदिवासी बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.