खेड : सोमवारी दि. 17 रोजी झालेल्या मतमोजणीत अस्तान सरपंच पदासाठी शिवसेना शिंदे गटाची महिला उमेदवार केवळ एका मताने आघाडीवर होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची तारीख 16 असताना 15 तारखेला मतदान झाल्याची तारीख मशीनवर का दाखवत आहे? असा आक्षेप तोंडी व लेखी घेऊन पुन्हा मतदान घेण्याची मागणी पराभूत उमेदवार व भाजपच्या आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. तालुक्यातील अस्तान ग्रामपंचायतीचा राखीव ठेवण्यात आलेला निकाल सोमवारी सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आला. आक्षेपानंतर तालुका निवडणूक प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून मार्गदर्शन मागवले होते. या मार्गदर्शनानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ज्योती निकम यांना विजयी घोषित केले. या ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. यामध्ये ज्योती निकम विरुद्ध रुपाली पवार ही लढत लक्षवेधी झाली. ज्योती निकम यांना 482 तर रुपाली पवार यांना 481 मते पडल्याने ज्योती निकम एका मताने आघाडीवर होत्या मात्र रुपाली पवार यांनी मतदान यंत्रातील मतदानाचा दि. 16 ऐवजी 15 दाखवत असल्याने आक्षेप घेतला.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं