मुबंई:-(दीपक परेराव) मंत्रालय विधी मंडळ वार्ताहर संघ, मुबंई येथे विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची पत्रकार परिषदेत यावेळी बाळासाहेब थोरात,भाई जगताप,एकनाथ खडसे अनिल परब यांची उपस्थिती यांची उपस्थिती होती.पत्रकार परिषदेत त्यांनी खालील मुद्दे उपस्थित केले.

 भंडारा गोंदियात घडलेली व त्यानंतरही घडलेल्या घटनांबाबत सरकारची भूमिका अतिशय बेपर्वाईची. भंडारा घटनेत पाच सहा दिवस एसपी नव्हते.

टीईटीसारख्या विषयात गैरप्रकार करून नातेवाईकांना नोकरी देण्याचा प्रकार करणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जातेय.

४० ते ५० दिवसात साडे सातशे निर्णय घेण्यात आले. ज्यात मविआने सुरू केलेल्या विकास कामना स्थगिती देण्यात आली.

शेतकऱ्यांना नुसतीच मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

ndrf चे निकष कालबाह्य आहेत.उदा: जमीन वाहून जाण्याचा प्रकार होतात. त्यात जमीन किती सेंटीमीटर, इंच, मिलिमीटर वाहून गेली सांगायचे आहे. याप्रकारे आधी मोजमाप झाले नाही, मग आता कसे होणार?

जनावर वाहून गेली असता त्या मोबदल्यासाठी जनावरांचे पोस्ट मार्टेम करायचे आहे. जनावरे वाहून गेली असताना ते कसे होणार?

बुलेट ट्रेनसाठी तातडीचा निधी दिला परंतु शेतकऱ्यांना निधी मिळत नाही... तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याकरिताही नवीन अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.

 जेणेकरून शेतकरी या भत्त्यापासून वंचित कसा राहील, हे पाहण्यात आले आहे.