कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन, उत्कर्ष बहुद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या वतीने बालविवाह मुक्त अभियानास सुरुवात....

बालविवाह मुक्त अभियानास बिडकिन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात....

बिडकिन प्रतिनिधी:- 

आज दि.१७ रोजी पैठण तालुक्यातील बिडकिन पोलिस ठाणे येथे बालविवाह मुक्त अभियान अंतर्गत विविध सेवाभावी संस्था तर्फे बालमित्र पोलीस कक्ष बिडकीन पोलीस ठाण्यात कॅण्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते.

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन नई दिल्ली व बालमित्र पोलीस कक्ष पोलीस स्टेशन बिडकीन औरंगाबाद ग्रामीण व उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या विद्यमानाने आयोजित

 बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत कॅन्डल मार्च चे आयोजन बिडकीन पोलीस ठाण्यात करण्यात आले होते‌. यावेळी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी बालविवाह न करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

बालविवाह मुक्त अभियानाचे आयोजन नोबेल विजेते भाईसाहेब कैलास सत्यार्थी,मार्गदर्शक विधान सर,राजू जी भारद्वाज,हनुमंत बारबोले,रमेश कुटे, सर हेमंती कुमार,दीक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानेश्वर हनवते अध्यक्ष उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक यशवंत इंगोले,शुभम हिवराळे, रतन इंगोले आदींच्या वतीने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम पर सहकार्य करण्यात आले.बालविवाह मुक्त अभियानांतर्गत २०२५ पर्यंत महाराष्ट्रातील बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच सर्व उपस्थित महिलांच्या वतीने आजच्या दिवसाची सुरुवात म्हणून मेणबत्ती पेटवत कॅडल मार्च काढण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी सरपंच सारिका मनोज पेरे,शिला विजय चव्हाण, महिला पोलिस नाईक राठोड,उमेद गटाच्या माया गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विकास गोर्डे, आदींसह 

यावेळी बिडकिन व परिसरातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस आणि इतर सहकारी महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

उत्कर्ष बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने उपस्थिती मान्यवर व महिला यांचा सत्कार करत समारोप करण्यात आला.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी शिवानंद बनगे यांनी हि कार्यक्रम प्रसंगी परिश्रम घेतले..

रविंद्र गायकवाड, बिडकिन