खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने महिलेस २ लाख ३२ हजारांची वैद्यकीय मदत
उपचार घेऊन परतलेल्या डांगे कुटुंबियांनी मानले आभार
------------------------------------------------------------------------------------------------
हिंगोली, दि.१७ (प्रतिनिधी) – आज घरातील मुले – मुली उच्चशिक्षित झाली आहेत. तरी देखील घारातील एखाद्या व्यक्तीस गंभीर आजाराची लागण झाल्याचे समजल्याने त्या घरातील प्रसन्नता आणि आनंदी वातावरण भंग पावते. असेच सेनगाव तालुक्यातील केंद्रा (बु) या लहानशा गावातील दहा जणांचे कुटुंब असलेल्या डांगे कुटुंबीयांच्या घरात झाले होते. परंतु खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने ५४ वर्षीय महिलेस आरोग्य उपचारासाठी २ लाख ३२ हजार ५०० रुपयाची आर्थिक मदत मिळुन देण्यात यश आल्याने डांगे कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत.