मेडिकल महाविद्यालयाचे उच्च रक्तदाब,मधुमेह निदान व उपचार शिबिर संपन्न.

बीड (प्रतिनिधी )आदर्श शिक्षण संस्थेचे सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमानाने येथील सौ.के.एस.के.महाविद्यालयात एकदिवसीय मोफत उच्च रक्तदाब व मधुमेह निदान आणि उपचार शिबिर शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले.

 शिबिराचे उद्घाटन एस के एच मेडिकल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विचार मंचावर हेल्थ ट्रस्टचे सचिव डॉ. शरद पडोळे, एच.एम.एम विभाग प्रमुख डॉ.रत्ना क्षीरसागर, एच.एम.एम.यु.जी.विभागप्रमुख डॉ. शेख नासेर,सौ.के.एस.के महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर उपप्राचार्य शिवाजी शिंदे, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.रेखा गुळवे,डॉ सतीश माऊलगे,प्राध्यापक सय्यद लाल उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र गोशाल यांनी शिबिराबद्दल सविस्तर माहिती देत असताना म्हटले की, मोबाईल हाईपर टेन्शन क्लिनिक या ॲप्लिकेशनची जनजागृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्व प्रेरणेने करावी, तसेच महाविद्यालयाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक शिबिरांस रुग्णांचा मोठा प्रतिसादही मिळत असल्याने समाधान ही व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्टचे सचिव डॉ.शरद पडोळे म्हणाले की,आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब व मधुमेहांसारखे आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यावर वेळीच योग्य ते उपचार केल्याने नियंत्रण मिळवणे ही शक्य असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रुलर हेल्थ ट्रस्ट यांचेकडून मोबाईल हायपरटेन्शन क्लिनिक हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर विनामूल्य डाऊनलोड करता येते. या अप्लिकेशनच्या माध्यमातून रुग्णांस अचूक निदान होते.ही बाब अतिशय दिलासादायी असल्याचेही त्यांनी यावेळी प्रतिपादित केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. पंडित खाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अनिता शिंदे यांनी मानले.

 या शिबिराच्या यशस्वीते साठी होमिओपॅथिक मटेरिया मेडिका विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.रत्ना क्षीरसागर,एच एम एम युजी विभागप्रमुख शेख नासेर,डाॅ.संगीता देबनाथ,डाॅ.दीक्षा इगतपुरे,डॉ.प्राची समुद्रे,डॉ.अनिल श्री सुधाकर गुट्टे यांनी परिश्रम घेतले.