डोमरी येथील कर्जेबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटूबातील एका सदस्यास शासकीय सेवेत घ्यावा - राहुल जाधव
पाटोदा (प्रतिनिधी) परतीच्या पावसामुळे पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या शेतात उभे असलेले पीक पावसामुळे भुईसपाट झाले आहे.तालुक्यातील पारगाव,डोगरकिंन्ही,
अंमळनेर,जिल्हा परिषद गटात पाऊसामुळे पीके जमिनीवर आडवी झाली असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या पीकाचे अतोणात नुकसान झाले असल्यामुळे पाटोदा तहसिल मार्फत सरकारला राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले तात्काळ पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावा तसेच डोमरी येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकास शासकीय सेवेत घ्यावा अन्यथा राष्ट्रीय पक्षाच्या वतीने आदोलन करण्यात येईल असा इशारा पाटोदा तहसिल मार्फत सरकारला कॉग्रेस पक्षाच्या वतीने कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव,नगरसेवक ऊमर चाऊस,इमरान शेख, सुनील काळे,लक्ष्मण भाकरे,शेख मुन्नाभाई यांनी केली आहे