बीड/शिरूर कासार 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

तालुक्यात अल्पावधीतच ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या सिंदफणा अर्बन बँकेचा 4 ऑगष्ट रोजी द्वितीय वर्धापन दिन असून "वर्धापनदिन व स्वातंत्र्याच्या सुर्वणमहोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकांसाठी खास विमा स्वरूपात सुरक्षा कवच योजना आणली आहे.या विमा सुरक्षा कवच योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेण्याचे व वर्धापण दिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांचेसह संचालक मंडळ यांनी केले आहे.

       दि.4ऑगष्ट रोजी स.11:00 वा संत-महंत व मान्यवरांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.शहरासह ग्रामीण भागामधे ऊसतोड मजूर,बांधकाम व तसेच शेतकरी व शेतमजूर यासह विविध काम करणारे कामगार मोठया प्रमाणावर असून सर्पदंश,वीजेचाशॉक,नैसर्गिक व सर्वप्रकारचे अपघात यासाठी हि विमा सुरक्षा योजना लागू असणार आहे.बँकेच्या माध्यमातुन सुरक्षा कवच देण्यात येणार आहे. सदरील योजनेचे वेगवेगळ्या स्वरूपात टप्पे करण्यात आले असून ग्राहकांना बँकेत त्या संदर्भात कर्मचारी सविस्तर माहिती देत आहेत...शंभर रुपयांत एक लक्ष रुपये...दोनशे रुपयांत दोन लक्ष.. तीनशे रुपयांत तीन लक्ष रुपये...चारशे रुपयांत चार लक्ष रुपये...पाचशे रुपयांत पाच लक्ष रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्यात येणार आहे.

        तसेच एक हजार रुपयांचा विमा काढणाऱ्या ग्राहकांना अडीच लाख रुपया पर्यंतचा वैद्यकीय खर्च मिळणार असून दहा लाख रुपयांचे विमा कवच मिळणार आहे.1000 रु च्या विम्याचा कालावधी मात्र फक्त 15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिनापर्यंतच असणार आहे.

            या योजनेचा ग्राहकांनी मुदतीच्या आत लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे संस्थापक आजीनाथ गवळी यांचेसह चेअरमन वैशालीताई गवळी,व्हा.चेअरमन सुरेंद्र भांडेकर,सचिव सुवर्णाताई कातखडे,संचालक बबनराव सुरे,रमेश जरांगेसर,भागवत मानेसर,गणेश बेदरे यांचेसह स्थानिक सल्लागार सदस्य अँड.भारत जायभाये,पत्रकार गोकुळ पवार,कु.योगीता गवळी यांचेसह व्यवस्थापक आकाश काकडेसर व कर्मचारी यांनी केले आहे.