राजापूर: विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने रायपाटणला चांगलाच दणका दिला आहे. वीज पडून दोन ट्रान्स्फॉर्मर निकामी झाल्याने गेले दोन दिवस संपूर्ण परिसराला अंधाराचा सामना करावा लागत आहे. शनिवार दुपारपर्यंत गायब झालेली वीज पूर्ववत सुरु झाली नव्हती.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गुरुवारी दुपारनंतर तालुक्याच्या पूर्व परिसरात परतीच्या पावसाचा चांगलाच दणका मिळाला. रायपाटण परिसरात दोन ट्रान्स्फॉर्मर वर वीज कोसळून परिसर अंधाराखाली गेला आहे. संबंधित विद्युत वितरणने शुक्रवारी दुरुस्ती करुन पूर्ववत विद्युत पुरवठा सुरु केला होता.मात्र, सायंकाळी पुन्हा विजांसह पावसाचे आगमन झाले आणि पुरवठा पुन्हा खंडित झाला होता. विद्युत वितरणचे अधिकारी व कर्मचारी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी कार्यरत होते. मात्र, शनिवारी दुपारपर्यंत खंडित पुरवठा पूर्ववत सुरू झाला नव्हता.

सलग तिसऱ्या दिवशीही अंधाराशी सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. शनिवारीही पावसाचे वातावरण पसरले होते. परतीच्या पावसाने तालुक्याच्या पूर्व परिसराला चांगलाच दणका दिला आहे.. परिसरातील काही विद्युत ट्रान्स्फॉर्मर वीज कोसळून निकामी झाले होते. ते तत्काळ बदलण्यात आले.