दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद मुंगिज उर्दू शाळेत डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त "वाचन प्रेरणा दिन" मौलाना आकिब वरवटकर यांच्या अध्यक्षतेखालील उत्साहात संपन्न झाला. मुख्याध्यापक मन्सूर जुवले यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. मोहम्मद भाक्षे यांनी कुराण पठणाने सुरवात केली. डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कलाम यांच्या जीवनावर आधारित मनोगते व्यक्त केली. यामध्ये मदीहा जुवले, हम्माद भाक्षे, रुशदा खळफे,सैजीन जुवले ,फिदा भाक्षे, हस्सान भाक्षे, मोहम्मद भाक्षे, यांनी प्रथम पारितोषिके जिंकली. दरम्यान विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सर्व मुलांनी पुस्तक वाचन केले.
दरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मार्गदर्शन मुख्याध्यापक मन्सूर जुवले, उपशिक्षक झैतून पेटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुश्ताक काळसेकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मौलाना अकिब यांनी वाचनावर भर देता मुलांना वाचनाचे फायदे विविध उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. व शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक कैसर वॉवघरकर ,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.