औरंगाबाद विद्यापीठाचा युवा महोत्सव!

" मुक अभिनयातून विविध विषयांवर सादरीकरण;मोबाईल व्यसन, मासिकपाळी विषयी केली जगजागृती"

औरंगाबाद(विजय चिडे) कोरोनाकाळात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले होते. परंतु त्यातून शिक्षण सर्वदूर पोहोचलेच नाही. मात्र अती मोबाईल वापरामुळे समाज माध्यमाचा तरुणावर कसा परिणाम झाला हे मुका अभिनयाच्या माध्यमातून विद्यार्थी कलावंतांनी सादर केले.

मुक अभिनयातून सादर केले अनेक विषय

रविवार 16 ऑक्टोबरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सव 2022 ला सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्यानंतर नाटयरंग मंचावर मुकाभिनयाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या कलाप्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी कलावंतांनी कोरोना काळातील महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्या बरोबरच तरुणाईचे प्रश्न मांडणारे विषय मुकाभिनयातून सादर केले.यात पाटोदा येथील वसंदादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी "मोबाईल व्यसनामुळे" होणारे परिणाम मुकाभिनयातून सादर करत मानवी नात्यावर आणि मानसिक तानावविषयी जनजागृतीपर संदेश दिला. तर कळंब येथील मोहेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डीजे चेच्या आवाजामुळे होणारे आरोग्य वरील परिणाम सादर केले.

मुलींच्या 'त्या' दिवसातील अडचणी अन् गैरसमज

आपल्याकडे आजही मुलींच्या मासिक पाळीविषयी बोलताना नाक मुरडले जाते. मुलींची मासिक पाळी म्हटलं की, तिच्यावर अनेक गोष्टी लादल्या जातात. तिला त्या दिवसात बाजूला बसवतात, त्या दिवसात तिची निट काळजी देखील जात नाही. हे असे प्रकार ग्रामीण भागांमध्ये जास्त पाहायला मिळतात. म्हणूनच मुलींच्या बाबतीत असणारी जुनाट विचारधारा, त्या चार दिवसातील आरोग्य विषयी वैज्ञानिक कारण आणि आरोग्य सुरक्षितत्याविषयी जनजागृती करणारा संदेश मुकाभिनयाद्वारे गेवराई येथील आर. बी. अटल महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी दिला.

शास्त्रीय तालवाद्यात 36 विद्यार्थी कलावंतांचा सहभागयुवा महोत्सवात नादरंग या मंचावर शास्त्रीय तालवाद्य या स्पर्धेचे अयोजन दुपारच्या सत्रात करण्यात आले होते. शास्त्रीय तालवाद्य या प्रकारालाही तरूणाईचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत रुपक, दादरा, केरवा, तिन ताल यासारख्या तालांवर वादकांची बोटे तबल्यावर थिरकली.

36 संघाचा सहभाग

तबल्याबरोबरच, बासरी, हार्मोनियम, सतार, वीणा, मृदुंग यांचे शास्त्रशुद्ध असे वादन कलावंतानी सादर करुन संगीतप्रेमींची मने जिंकली. यात एकूण 36 संघानी सहभाग नोंदवला होता. तर सायंकाळच्या सत्रात शास्त्रीय सुरवाद्य ही स्पर्धा घेण्यात आली त्यात 14 संघ सहभागी झाले होते.