अकोला दिनांक 16 ऑक्टोंबर 2022

हनुमान चौक अकोट फाईल अकोला स्थानिक शंकर नगर येथे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दोन मजली डिजिटल अभ्यासिका झाली पाहिजेत याकरिता शंकर भाई कंकाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनात  स्वाक्षरी अभियानजनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन रेखाताई घरडे व अमन घरडे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते पवनजी कनोजिया ,गणेश जी सपकाळ, बाळू ढोले पाटील, आसमा अहमद सुमेरा अहमद ,सुरज मेश्राम, अन्सार अली, सचिन रामटेके, अल्ताफ शेख ,कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता या युवकांनी सहकार्य केले .

रोशन कुंटे योगेश इंगळे धीरज पाटील प्रफुल जाधव छोटू वाघमारे अभिजीत गायकवाड धम्मदोष गायकवाड शुभम कुरे यावेळी उपस्थित होते.