रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरु लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव अशा दोन विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी गाडी 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत चालविले जाणार आहे.

दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव 011 87 /0 11 88 दिवाळी स्पेशल साप्ताहिक विशेष गाडी दि. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत दर रविवारी रात्री दहा वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मडगावला ते सकाळी साडेदहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मडगाव येथून 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत दर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सुटेल आणि रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

दिवाळी स्पेशल दुसरी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरु दरम्यान धावणार आहे. ही गाडी 01185 /01186 दिनांक 21 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत धावणार आहे. दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सव्वा दहा वाजता सुटेल दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ती मंगळुला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळूरू स्थानकावरून दर शनिवारी सायंकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस ला ती दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल.

या दोन्ही गाड्या 17 डब्यांच्या राहणार आहेत. दिवाळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या या गाड्या ठाणे पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रत्नागिरी वैभववाडी, कणकवली अशा स्थानकांवर थांबे घेत मडगाव मंगळुरू अशा धावणार आहेत.