कासारीत गणेशनगर येथील माळरानावर फुलली पंढरी

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

-रोज पहाटे काकडा आरतीसाठी जमते आबालवृद्ध भाविकांची मांदियाळी 

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

        दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा झाली की सर्वांना जाग येते ती गणपतीमाळावरील गणेश मंदिरात सलग महिनाभर चालत असणाऱ्या गोड,सुंदर अशा काकड आरतीने व श्रावण महिन्याची सायंकाळ भक्तिमय होते हरिपाठाने.

        तळेगांव ढमढेरे-न्हावरा रस्त्यालगत तळेगांव पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव,कासारी , टाकळी भिमा आणि निमगांव म्हाळूंगी या चार गावांच्या शिवेवर असणाऱ्या माळरानावरील हे एक गणेशाचे जागृत देवस्थान. माळरानावर गणपतीचे जागृत देवस्थान असल्याने सर्वजण या माळाला 'गणपतीमाळ' असे म्हणतात. 

        पूर्वी गणपतीमाळ म्हणजे आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना गुरे चारण्यासाठी एक हक्काची जागा होती.वीज , पाणी यांसारख्या अनेक सुखसुविधांचा अभाव व लोकवस्ती नसल्याने दिवस मावळतीला जाण्याअगोदरच सर्वत्र सामसूम होत होती. परंतू अलीकडे दहा -बारा वर्षांपासून हे चित्र अगदी बदलून गेले आहे. सन २००८ साली पंढरीनाथ (आण्णा) भुजबळ , सतिष भुजबळ आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून मंदिर उभारण्यात आले आणि खऱ्या अर्थाने माळरानावरच्या पंढरीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मंदिराचे बांधकाम झाल्यानंतर एक-दोन वर्षांतच काकड आरतीला सुरुवात झाली आणि या ओसाड असलेल्या माळरानावर रोज पहाटे भक्तीचा मळा फुलू लागला.

          दरवर्षी आश्विन कृ प्रतिपदा या दिवशी गणपती मंदिरात काकड आरतीची सुरूवात होते. पहिल्या वर्षी सुरू झालेल्या काकड आरतीला वीस-पंचवीस भाविक संख्या असणारी या वर्षी दिडशे ते दोनशे वर पोहोचली आहे. या सर्व भाविकामध्ये बालगोपाळांपासून ते जेष्ठांपर्यत सर्वांचा समावेश असतो. महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. पहाटे चार वाजता काकड आरतीसाठी परिसरातून तळेगांव ढमढेरे , कासारी, टाकळी भिमा आणि निमगांव म्हाळूंगी येथील भाविक उपस्थित असतात. या काकड आरतीच्या माध्यमातून अनेक बालगोपाळांचे मिळून एक बालभजनी मंडळ तयार झाले आहे तर काही गायक , कीर्तनकार देखिल घडले आहेत. 

             या महिनाभर चालत असणाऱ्या काकड आरती बरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात तुळसी विवाहाच्या दिवशी गणपती मंदिरात तुळशी विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो.अशा या गोड ,सुंदर काकड आरतीची सांगता कार्तिक शु .१५ या दिवशी केली जाते या दिवशी गणपती मंदिर ते होमाचीवाडी अशी दिंडी प्रदक्षिणा घातली जाते. या दिंडी सोहळ्यासही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. 

          काकड आरती व हरिपाठाबरोबरच माघ शु चतुर्थी या दिवशी परिसरातील सर्व गणेशभक्त एकत्र येऊन गणेश जंयती अत्यंत उत्साहात साजरी करतात. यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सकाळपासून प्रसन्न वातावरणात लहानग्यांपासून ते सत्तर वर्षाच्या जेष्ठ नागरिकांची या गणेश मंदिरात जयंतीनिमित्त उपस्थिती असते.पहाटे काकड आरती, सकाळी श्रींची महापुजा , सायंकाळी हरिपाठ व महाप्रसाद आदि कार्यक्रम होतात.तर रात्री किर्तन व त्यांनंतर बालभजनी मंडळाचा हरिजागर अशी कार्यक्रमांची रूपरेषा असते.

         अशी हि गणेश मंदिरातील काकड आरती शिरूर तालुक्यातील सर्वात जास्त भाविक संख्या असणारी काकड आरती गणली जाते.

(शब्दांकन)

 कु.आकाश हरिभाऊ भोरडे 

मु.पो.निमगाव म्हाळूंगी

ता.शिरूर. जि.पुणे 

मो.नं.9156715275