पावसाळा असो की हिवाळा असो भल्या पहाटे उठून वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घेऊन पायी पायी चालत किंवा सायकलवरून घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाहणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याचा 15 ऑक्टोबर हा सन्मानदिन माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बीड जिल्ह्यात जवळपास 50 वृत्तपत्र विक्रेते असून बीड शहरात सात पेपर विक्रेते आहेत तसेच जिल्ह्यात एक हजाराच्या वर घरो घरी जाऊन पेपर वाटणारे विक्रेते तथा हॉकर्स आहेत इमाने इतबारे व्यवसाय करणारा घटक तसा उपेक्षित राहिला आहे वृत्तपत्र विक्रेता व हॉकर्स च्या विविध मागण्यासाठी वृत्तपत्र विक्रेता संघटना वारंवार शासन दरबारी आपल्या मागण्या असंघटित कामगाराचा दर्जा मिळाला पाहिजे घरकुल व म्हाडा योजनेअंतर्गत घरकुल मिळाले पाहिजे पेपर स्टॉल साठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याद्वारे विविध योजना राबवल्या पाहिजेत तसेच वाचन संस्कृती वाढण्यासाठी देखील शासनाने प्रयत्न केला पाहिजे आदी मागण्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने शासन दरबारी वारंवार लोकशाही मार्गाने आंदोलन करून मागण्या मागत आहेत परंतु अद्याप पर्यंत शासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही व वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त बीड शहरातील वृत्तपत्र विक्रेते सुमती वाघिरे सुदाम चव्हाण परमेश्वर खरात विद्याभूषण बेदरकर गणेश गणेश भालेकर प्रतीक भोंडवे अमित सासवडे प्रदीप गव्हाणे मंगेश शेटे अजय घोलप अभिनंदन बेदरकर आदींचा विक्री स्टॉलवर जाऊन मातृभूमी प्रतिष्ठान व बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन डॉसंजय तांदळे सुदाम कोळेकर प्राध्यापक बाळासाहेब नागरगोजे यांनी सत्कार केला यावेळी महेंद्र कांबळे समाधान जाधव बालाजी जगतकर आदींची उपस्थिती होती