पालम (प्रतिनिधी) :-
जनता आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद असेल तर कोणतेही शासकीय काम शांततेत पूर्ण होते. मात्र, अनेकदा सर्वसामान्य माणसाला कर्मचारी व्यवस्थित माहिती देत नाहीत. त्यामुळे संवादाचा विसंवाद होतो. हे लक्षात घेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सौजन्यशील व्यवहार ठेऊन सुंसंवाद निर्माण करायला हवा, अशी अपेक्षा गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली.
पालम तालुक्यातील चाटोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक अभियंता माणिक तेलंग, उप अभियंता अंकुश कौरवार,
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष बालासाहेब रोकडे, रासप अध्यक्ष तुकाराम पाटील, माजी सभापती गणेशराव घोरपडे, माजी उपसभापती अण्णासाहेब किरडे, नगरसेवक उबेद खान पठाण, अंगदराव किरडे भागवतराव किरडे, अजीम खान पठाण, दिगंबर किरडे, प्रभाकर जाधव, गंगाधर शेवटकर, विनोद किरडे, रामेश्वर लवटे, संतोष पैके बालाजी मुस्तापुरे, भगवान सिरस्कर, गणेश हत्तीआंबिरे उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, वीजपुरवठा हा ग्रामीण व शहरी भागातही गरजेचा बनला आहे. आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही. त्यामुळे तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर प्रगती करण्यासाठी वीज हा घटक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे इथे सुरु झालेल्या उपकेंद्रामुळे परिसरातील काही गावांना निश्चित फायदा होणार आहे. मात्र, लोकांना महावितरकडून जशा अपेक्षा आहेत. तशाच अपेक्षा महावितरणालाही ग्राहकांकडून आहेत. म्हणून वीजेचा आवश्यक तितकाच वापर करा. वीज चोरी न करता कायदेशीर जोडणी करुन घ्या. तरच भारनियमन कमी होण्यास मदत होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम पाटील तर सूत्रसंचालन विनोद किरडे आणि आभार आण्णासाहेब किरडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास पदधिकारी, गावकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.