बीड. ( प्रतिनिधी). मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यांत परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे या परतीचा पावसामुळे बीड जिल्ह्यात सोयाबीन व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि सध्याचं राज्य सरकार एकमेकांची जिरवण्यात व्यस्त आहे शासनाचे ही या शेतकऱ्यांन कडं दुर्लक्ष आहे आज बीड जिल्ह्यातील खंडीभर नेते पुढारी आमदार खासदार माजी मंत्री हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांन वर परतीच्या पावसामुळे पडलेल्या संकटावर मुग गिळून गप्प आहेत दिवाळी तोंडावर आली आहे सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू होईल माझ्या शेतकरी राजा मात्र परतीचा पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे चिंतेत आहे शेतकरी हवालदिल झाला आहे " लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे " पण याच पोशिंद्यावर या परतीचा पावसामुळे उपासमारीची वेळ आली आहे तरी राज्य सरकारने व शासनाने पंचनामे व इतर कुठलेही निकष न लावता बीड जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट परतीचा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रस्तावर उतरून राज्य सरकारचा व शासनाचा निषेध म्हणून धरणे आंदोलन करणार असे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे व जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर यांनी सांगितले आहे

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं