रत्नागिरी : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या रत्नागिरी शहर संपर्क प्रमुख पदी ॲड. संकेत घाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उप शहरप्रमुख विजय खेडेकर व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

तसेच याप्रसंगी राष्टवादी काँग्रेस पक्षातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आलेले अमोल पावसकर यांची शाखाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. सौ. प्रेरणा विलणकर यांची महिला उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली व मयेकर मॅडम यांची उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल. 

याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख विजय खेडेकर याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, बाबू म्हाप आणि मान्यवर उपस्थित होते.