पुणे महानगरपालिकेच्या वतीने वाघोलीत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत असताना मार्वल फ्रीया सोसायटीजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत कचरा व्यवस्थापन प्रकल्प नियोजित असताना याठिकाणी सोसायट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. यासंबंधित निवेदनही महापालिकेला नागरिकांनी दिले आले असून शनिवारी (दि.१५) सोसायटीतील नागरिकांनी नियोजित कचरा प्रकल्पाला विरोध दर्शविला. वाघोलीतील कचऱ्याचे नियोजन महानगरपालिकेकडून केले जात नसल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याशी फोनवरून चर्चा केली, यावेळी आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी हवेलीचे आमदार अशोक पवार माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे सुनील चाचा जाधवराव शिवदास उबाळे बाळासाहेब सातव गवळी सागर गोरे यांच्यासह परिसरातील सोसायटी धारक नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते