संगमेश्वर: आपण पोलीस इन्स्पेक्टर आहोत असे सांगून वृद्ध महिलेकडील दोन सोन्याच्या पाटल्या व दोन सोन्याच्या बांगड्या असा एकूण १ लाख ७५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना साडवली सह्याद्रीनगर येथे शनिवारी सकाळी घडली.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धीरज देसाई यांनी देवरूख पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. धीरज देसाई यांची आई कल्पना अनंत देसाई या शनिवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास देवरूख संगमेश्वर या मुख्य रस्त्यावरून ये-जा करत होत्या. याचवेळी एका व्यक्तीने त्यांना आपण पोलीस इन्स्पेक्टर आहोत असे सांगितले.

आत्ताच चोरी झाली असून तुम्ही सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरू नका असे सांगितले. हातातल्या बांगड्या व पाटल्या काढून कागदात ठेवण्यास सांगितले. याचवेळी या व्यक्तीने हातचलाखी करत सोन्याच्या बांगड्या आपल्या ताब्यात घेत नकली बांगड्या कल्पना देसाई यांच्याकडे सुपुर्द केल्या. गळ्यातील सोन्याची चेन देखील हा व्यक्ती मागत होता. कल्पना देसाई या घरी गेल्यानंतर कागदामध्ये नकली बांगड्या असल्याचे दिसून आले. सदर व्यक्तीने बंद दुकानाचा फायदा घेत चोरी केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्यक्तीला दुचाकीवरील दोन जणांनी सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.