रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे ग्रामपंचायतीत विविध विकासकामे नागरिकांनी सुचविली असून ती विकासकामे करतानाच १५ कामे मंजूर करण्यात आली. त्यांच्या निविदा नुकत्याच निघाल्या असून निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर असल्याने अनेकजण ही कामे मिळण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
नाचणे ग्रामपंचायीच्या हद्दीत नाचणे समर्थनगर येथील क्रीडांगण विकासित करणे व जीमचे बांधकाम करणे १.५० लाख रुपये, नाचणे भगवती मंडप अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे १ लाख १९ हजार ग्रामपंचायत जवळून अमोल सावंत यांच्या अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे २.५० लाख कर्णधर नागवेकर ते संतोष वायंगणकर पर्यंतचा रस्ता विकसित करणे २.५० लाख नाचणे काजरघाटी शिवसेना शाखेसमोर रस्त्याला आरसीसी गटार बांधणे २.७१ हजार तसेच नाचणे रसाळवाडी जावकर यांच्या घरापर्यंत रस्त्याला आरसीसी गटार बांधणे ३ लाख ७५ हजार अशा प्रकारची विविविध १५ कामे १५ व्या वित्त आयोगातून मंजूर करण्यात आल्या असुन त्याच्या निविदा नुकत्याच प्रकाशित करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामस्थांनी ही सर्व कामे चांगली गुणवत्तापूर्वक व्हावी अशी मागणी आता करायला सुरुवात केली आहे.