*गुजर प्रशालेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे,प्रतिनिधी:

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शनिवार (दि.१५) रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे ,पर्यवेक्षक मोहन ओमासे, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आढाव, प्रशालेचे ग्रंथपाल शंकर उकले, जेष्ठ लेखक व समीक्षक प्राध्यापक कुंडलिक कदम व रत्नप्रभा देशमुख यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी 'वाचन प्रेरणा दिन' या अक्षरांची प्रतिकृती शालेय मैदानावर सादर केली.यासाठी प्रशालेच्या उपशिक्षिका सोनाली हिले व प्रियंका नांदखिले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे प्रा.कुंडलिक कदम यांनी वाचनाने जीवन कसे समृद्ध होते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रशालेतील विद्यार्थिनी धनश्री शिंदे कृतिका कुरकुरे व नारायणी चौधरी यांनीही वाचन प्रेरणा दिनाबद्दल माहिती तसेच डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या उपशिक्षिका हर्षदा परदेशी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी मानले.