रत्नागिरी : कुडाळ - मालवणचे आमदार वैभव नाईक यांना मालमत्तेच्या अनुषंगाने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र आमदार नाईक यांनी माहिती सादर करण्यासाठी मुदत मागितली असून, ते बुधवारी चौकशीसाठी हजर राहिले नाहीत.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयच्या रत्नागिरी विभागाकडून चौकशी सुरु आहे. गेल्या शनिवारी कणकवली शासकीय विश्रामगृहावर त्यांची प्राथमिक चौकशी झाली होती. मात्र त्यानंतर त्यांना लेखी नोटीस बजावण्यात आली होती. आमदार नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. उघड चौकशीच्या अनुषंगाने दिनांक ०१/०१/२००२ ते २९/०९/२०२२ या कालावधीतील आमदार नाईक यांचे उत्पन्न खर्च व मालमत्ता याबाबतची तपासणी होणार आहे. त्यासाठी बुधवार १२ ऑक्टोबर २०२२ रोजी ११ वाजता आमदार नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पोलीस उपअधीक्षकांनी नाचणे रोड, मारुती मंदिर येथील कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती. मात्र आमदार नाईक चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी मुदत मागितली असून, तसे पत्र कार्यालयात दिले आहे.