संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड ग्रामपंचायतीतर्फे जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.ग्रामविकास अधिकारी एम आर कांबळे व सरपंच नम्रता कवळकर यांनी उपस्थितांना हात धुण्याचे महत्व पटवून दिले. वारंवार हात धुतल्याचा फायदा कोरोनाच्या काळात कसा झाला याविषयी माहिती दिली. हात धुतल्याने आजारांपासून कसा बचाव होतो याविषयी सांगितले.

ग्रामस्थांना हात धुण्याची शास्त्रीय पद्धत समजावून सांगितली.यावेळी शौचाहून आल्यावर, जेवण करण्यापूर्वी, जेवण झाल्यावर,कामे केल्यावर, अशा विविध वेळांना हात धुण्याचे आवाहन करण्यात आले व फायदे सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांना प्रात्यक्षिक ही करून दाखविले. दरम्यान गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, यामध्ये विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व फायदे समजावून सांगण्यात आले. यावेळी सरपंच सौ नम्रता कवळकर,ग्रामविकास अधिकारी एम आर कांबळे, उपसरपंच रवींद्र पवार, संदीप उर्फ बबू कवळकर, अन्य ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.