राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे यांनी लियाफी आंदोलनाला दिली भेट

 लियाफी विमा संघटने च्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा.

जिंतूर शहरातील भारतीय जीवन विमा निगम सेटलाईट ब्रांच समोर मागील तीन दिवसापासून विमा प्रतिनिधी ची लियाफी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे,माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.

  जिंतूर शहरातील भारतीय जीवन विमा निगम सेटलाईट ब्रांच समोर विमा प्रतिनिधी संघटना लियाफी च्या वतीने विमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी (दि.14/10) राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे,न.प.चे.माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे,माजी जि.प.सदस्य रामराव उबाळे,माजी नगरसेवक संजय निकाळजे, सौ.आशाताई उबाळे,माजी मुख्य प्रशासक मनोज थिटे,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब काजळे,आदींनी आंदोलन स्थळी जाऊन भेट देऊन विमा प्रतिनिधींच्या अडचणी ऐकून घेतल्या व माजी आमदार विजय भांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सर्व मागण्या बाबत सविस्तर सांगून केंद्र सरकार कडून या मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे असा आश्वासन प्रेक्षा भांबळे यांनी दिली यावेळेस विमा प्रतिनिधींचे सर्व विमा प्रतिनिधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.