अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाक्या चोरीचे सत्र सुरू आहे. रोजच चार ते पाच दुचाक्या चोरून नेत आहे. चोरीची दुचाकी इतवारा बाजार परिसरात विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेतले. आरोपीकडून तीन दुचाक्या जप्त केल्या आहे.आरोपी शेख शाहरुख ऊर्फ आरु वल्द शेख राऊफ राहणार गुलीस्तानगर हा चोरीची दुचाकी इतवारा ते चित्रा चौक येथे घेऊन फिरत होता. दुचाकी विकत घेण्यासाठी गिऱ्हाईक शोधत होता. ही माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
आरोपी याने दुचाकी लुकमान शाहा हबीब शहा रा. इकबाल कॉलनी याच्यासोबत दवा बाजार रायली प्लॉट येथून चोरल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्यावरून आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाक्या जप्त दुचाकी क्र . एम.एच .२७ - एयू ७०२ , एमएच २७ एबी ७५१७ , एमएच २७ एवाय २०६८ या ताब्यात घेतल्या आहे . आरोपी हा शहरातील दुचाक्या चोरून नागरिकांना अत्यंत कमी भावाने विकत असल्याचे उघड झाले आहे . आरोपी याला पुढील कारवाईसाठी राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे