खेड : जल फाउंडेशन कोकण विभाग या नोंदणीकृत संस्थेतर्फे २०१९ पासून कोकण रेल्वे मार्गावरील खेड येथे खेड स्थानकावर न थांबणाऱ्या काही गाड्यांना थांबे मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

दोन वर्षे कोरोनामुळे तसेच २०२० चे मार्च ते सप्टेंबर असे सहा महिने गाड्या बंद असल्यामुळे नाईलाजाने पुढे काही प्रगती होऊ शकली नाही. परंतु सप्टेंबर २०२० पासून गाड्या हळूहळू पूर्ववत झाल्या व प्रवासी संख्या पूर्वीएवढीच झाली. सध्या सर्वच गाड्यांना गर्दी होऊन खेड येथे गाड्या पुन्हा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. आरक्षण असलेल्या प्रवाशांनाही गाडीत निवांतपणे चढता येईलच याची शाश्वती देता येत नाही. गणेशोत्सवात गाडीचे दरवाजे एन उघडल्यामुळे गाडीवर दगडफेक होण्याची दुर्दैवी घटना याही वर्षी सुरु राहिल्या.

कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्राच्या वाट्याला फारशा गाड्या आल्याच नाहीत. आहेत त्या जवळजवळ सर्वच गोव्यासाठी असून विशेषतः रत्नागिरीच्या उत्तरेकडील तालुक्यांचे आधीच भरुन आलेल्या गाड्या व अपुऱ्या आरक्षण कोट्यामुळे फारच हाल होतात. महाराष्ट्रात नवीन गाडीची मागणी केल्यास रेल्वेमार्गाची क्षमता संपल्याचे कारण रेल्वे प्रशासन देते. इतर राज्यांना मात्र हव्या तेवढ्या गाड्या उपलब्ध होतात.

अलीकडे मध्य रेल्वेने रत्नागिरी-दादर पॅसेंजरचा प्रवास दिव्यालापर्यंत थांबवून त्या जागी दादर- गोरखपुर आणि बालिया गाड्या सुरु केल्या आहेत. कोकण रेल्वेही जबलपूर- कोयंबतूर, गांधीधाम -तिरुनेलवेलीसारख्या गाड्यांना मार्ग उपलब्ध करुन देत असते. मंगळूरू -भावनगर सुपरफास्ट एक्सप्रेसही सुरु होण्याची चर्चा आहे. परंतु त्याने महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सुटतील का ही शंका आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करता जल फाउंडेशनने रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांच्याकडे पुढील मागण्या पुन्हा केल्या आहेत:

१. मुंबई ते माणगाव/महाड/खेड/चिपळूण तालुक्यात प्रवास करण्यासाठी पनवेल किंवा दिवा येथे गाडी बदलणे प्रवासी टाळतात. त्यामुळे मुंबई चिपळूण दरम्यान दादर, ठाणे, दिवा, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबणारी नवीन नियमित व दैनिक गाडी सुरु करणे.

२. १२०५१/१२०५२ जनशताब्दी एक्सप्रेसला खेड येथे थांबा देणे.

३. १२६१७/१२६१८ मंगला एक्सप्रेसला खेड येथे थांबा

४. २२११९/२२१२९ तेजस एक्स्प्रेसला खेड येथे थांबा

५. १२२०१/१२२०२ गरीबरथ एक्स्प्रेसला खेड येथे थांबा

६. २२११३/२२११४ लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेसला खेड येथे थांबा

७. २२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस -करमळी एक्स्प्रेसला खेड येथे थांबा

८. २२४७५/२२४७६ हिस्सार -कोइंबतूर एक्स्प्रेसला खेड येथे थांबा

९. २२६३० तिरुनेलवेली -दादर एक्सप्रेसला खेड येथे थांबा

१०. १२१३४ मंगळूरू -मुंबई एक्स्प्रेसला खेड येथे थांबा

११. १०१०५/१०१०६ सावंतवाडी -दिवा -एक्सप्रेसचा दिवाणखवटी येथील थांबा, पूर्ववत करणे

या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल, असा इशारा : जल फाउंडेशन कोकणने दिला आहे.