पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यात पीक काढणीच्या दिवसात पावसाने जोर वाढवला असल्याने शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला पिक निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जात असून महसूल विभागाने अंमळनेर जिल्हा परिषद गटातील व तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सोयाबीन इत्यादी पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी आमदार सुरेश धस समर्थक भाऊसाहेब भवर यांनी केली आहे.कोरोना नंतर शेतकऱ्यांवर है भयानक संकट आल्यामुळे चांगल्या मान्सून पावसाने शेतकरी सुखावला मेहनतीने पेरणी केली पिकं चांगले आले पण परतीच्या पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांचा हाताशी आलेला घास जवळपास हिरावून घेतला आहे.अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पिके वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी शेतात तळे साचले आहेत.जे थोडेफार पीक आलेत त्याठिकाणी सुद्धा पाणी साचलेले असल्याने काढणी करणे अवघड होऊन बसले आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवले सर्वच प्रकारचे पीक अतिवृष्टीमुळे डोळ्यासमोर खराब झाली आहेत.आशा परिस्थिती शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असल्याने प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आमदार सुरेश धस समर्थक अंमळनेर जिल्हा परिषद गटाचे नेते भाऊसाहेब भवर व पारगावचे युवा सरपंच पद्माकर घुमरे यांनी केली आहे.