शिरुर: शिरुर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाला न जुमानता काम करावे तसेच जर शिरुर तालुक्यातील कोणी भाजपाचा पदाधिकारीअधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देत असतील तर अधिकाऱ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे शिरुर तालुका भाजपाचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी "शिरुर तालुका डॉट कॉम" शी बोलताना सांगितले.
"शिरुर तालुक्यात भाजपा पदाधिकाऱ्यांकडुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरल जातंय वेठीस" अशा आशयचे वृत्त "शिरुर तालुका डॉट कॉम" ने प्रसिद्ध केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सोनवणे म्हणाले, भाजपा हा पक्ष शिस्त पाळणारा पक्ष असुन जर कोणी पदाधिकारी असा गैरप्रकार करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली काम करु नये. तसेच अधिकाऱ्यांनी कोणताही भाजपाचा पदाधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर पुराव्यासहित त्याची तक्रार माझ्याकडे करावी असेही त्यांनी सांगितले.