औरंगाबाद : भर दिवसा चरण्यासाठी गेलेल्या वासराला बिबट्या वन्यप्राण्याने केले जखमी  . वनविभागाचे कर्मचारी , आणि वनमजुर यांनी घटनास्थळी भेट दिली . यावेळी बिबट्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला . शेतवस्त्यांवर पाळीव कुत्री , बकऱ्या , कोंबड्या , गायी , म्हैशींची सहज शिकार मिळत असल्याने बिबटे मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात असल्याचे सांगितले जाते . उपसरपंच मो . आरिफ मो . लुखमान यांनी सांगितले . जाईचादेव डोंगरावर बिबट्या व अस्वल असल्याची चर्चा सर्वत्र आहे . या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सावध रहावे , रात्रीवेळी शेतकऱ्यांनी शेतात सावधगिरी बाळगावी असे वनविभागाचे वनरक्षक सुनील खरोदे यांनी सांगितले . सोयगाव : तालुक्यातील सावळदबारा • येथील एका शेतकऱ्याच्या शैलेश राजेंद्र जैस्वाल यांच्या गाईच्या वासराला वन्यप्राण्याने गंभीर जखमी केले आहे . परिसरात वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळल्याने याची माहिती वनविभागाला सागर जैस्वाल यांच्या कडून देण्यात आली . बुधवारी वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वासराची तपासणी करताना दि . १२/२०/२२ रोजी सावळदबारा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी वासराची पाहणी केली