रत्नागिरी : तोंडावर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी सुरत ते करमाळी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष गाडीची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी दि. २५ ऑक्टोबर रोजी धावणार आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने कोकण रेल्वेने या गाडीचे नियोजन केले आहे. ही गाडी (०१९९३) दि. २५ ऑक्टोबर रोजी सुरत येथून सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी गोव्यात करमाळीला ती दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१९९४) करमाळीहून दि. २६ रोजी दुपारी २.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता ती सुरतला पोहोचेल.
ही 'दिवाळी स्पेशल' गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे. एकूण सतरा डब्यांच्या या गाडीची कोच रचना वातानुकूलित चेअरकार १, सेकंड सीटिंग १४, एसएलआर २ अशी असणार आहे.