चुनाळा येथील शेतकरी अजय नथ्थु कार्लेकर यांच्यावर एक महिन्यांपूर्वी शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला केला त्या हल्ल्यात गंभीर जखमी अजयवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात याला. वनविभागाला वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत व जखमींना वेळेत मदत पोहचविण्याचे आदेश केले होते. त्या आदेशाचे पालन करीत वनविभागाने जखमी अजय कार्लेकर यांना ३० दिवसाच्या आत आर्थिक मदत मंजूर केली आहे. (दि. १३) रोजी वनअकादमी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते एक लाख पंचेविस हजार रुपयांचा धनादेश जखमीची पत्नी विमल अजय कार्लेकर यांना देण्यात आला. यावेळी राजूऱ्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर, उप वनसंरक्षक स्वेता बोडू, उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, चूनाळा ग्राम पंचायतीचे सरपंच बाळनाथ वडस्कर, भाजप किसान मोर्चा चे प्रदिप बोबडे उपस्थितीत होते. ग्रामीण भागात शेतात मोठ्याप्रमाणात वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू आहे. भीतीमय परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतात काम करणे धोक्याचे आहे. अशा वातावरणात काम करीत असताना चुनाळा येथील अजय नथ्थु कार्लेकर यांच्यावर रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्याचेवर उपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे उपचार सुरु असताना. राजुरा गडचांदूर येथील (३ सप्टेंबर) व्यस्त दौऱ्यात सुधिरभाऊ मनगंटीवार यांना माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी ही बाब सांगितली परंतू व्यस्त कार्यक्रमामुळे दिवसा भेट घेता आली नाही, पण या घटनेची आठवण ठेऊन कार्यक्रम आटोपून मध्यरात्री १२ वाजले असतांना सुद्धा दवाखान्यात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याची भेट घेऊन विचारपूस करीत जखमींचे सांत्वन केले यातूनच मुनगंटीवार यांचे उपस्थितांना माणुसकीचे दर्शन दिसून आले. यावेळी रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर कुळमेथे यांना जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या. व उपस्थीत असलेले उप विभागीय वन अधिकारी अमोल गर्कल व वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, प्रभारी तहसिलदार गांगुर्डे यांना नियमानुसार वेळेत जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्यानुसार वनविभागाने ३० दिवसात जखमींना आर्थिक मदत म्हणून एक लाख पंचेविस हजार मंजूर केले. मंजूर धनादेश वितरित केल्याबद्दल कार्लेकर कुटुंबीयांनी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व वन विभागाचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહેસાણા દૂધ સાગર ડેરીના ચેરમેન વિપુલ ચૌધરીની જામીન અરજી મંજૂર
મહેસાણા દૂધસાગર ડેરીના ભૂતપૂર્વ ચેરમેન વિપુલ ચૌધરીની જામીન અરજી મંજૂર કરવામાં આવી છે....
Delhi के ORN में UPSC की तैयारी कर रही लड़की ने क्यों जान दी? 3 पन्ने की दर्द भरी दास्तां
Delhi के ORN में UPSC की तैयारी कर रही लड़की ने क्यों जान दी? 3 पन्ने की दर्द भरी दास्तां
इस सरकारी कंपनी के शेयर ने निवेशकों को किया मालामाल, दो दिन में 37 प्रतिशत का दिया रिटर्न
नई दिल्ली, बिजनेस डेस्क। शेयर बाजार पिछले कुछ कारोबारी सत्रों से एक सीमित दायरे में कारोबार...
ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರನ್ನು ಭೇಟಿಯಾದ ಷಡಾಕ್ಷರಿ
ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಷಡಾಕ್ಷರಿ ಅವರ ನಿಯೋಗದ ಸದಸ್ಯರು ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ...
पामेरा में राष्ट्रीय खेल दिवस पर हुआ खेलों का आयोजन
*पामेरा मे राष्ट्रीय खेल दिवस पर हुआ खेलों का आयोजन*
रेवदर पामेरा के श्रीमती...